कॅमेरानं पकडली बँकेतली चोरी

November 22, 2008 10:32 AM0 commentsViews: 2

22 नोव्हेंबर, मुंबईचेंबूर इथल्या युनायटेड मनी एक्सचेंज बँक मध्ये 6 नोव्हंबर ला पाच चोरांनी धारधार शस्त्रांच्या सहाय्याने बँकेत सुमारे पाच लाखांची चोरी केली होती. पण, बँकेत लावलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमेर्‍यामुळे चोरांची ओळख पटली आणि पोलिसांनी त्या चोरांना अटक केली . कॅशियर जवळ रोख रक्कम असते याची माहिती या चोरांना होती. एकूण पाच चोर होते. एक चोर बँकेच्या बाहेर पहारा देत होता तर बाकीचे चोर बँकेत चोरी करत होते. बँकेत शिरलेल्या चार चोरांपैकी दोघांनी धारधार शस्त्राच्या धाकावर बँकेतील कर्मचार्‍यांकडून पैसे गोळा केले. हे सगळं घडताना त्याच्या प्रत्येक हालचालीवर बँकेत लालेल्या सी.सी.टीव्ही कॅमेर्‍याची नजर होती आणि हाच धागा पकडून पोलिसांनी या चोरांना गजाआड केलं.

close