देशभरात रंगांची उधळण

March 8, 2012 9:09 AM0 commentsViews: 7

09 मार्च

आज धुळवड अर्थात रंगांचा उत्सव…सकाळपासूनच या रंगांच्या उत्सावाला सुरूवात झाली. बच्चेकंपनींपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेजण या रंगात न्हाऊन निघत आहे. गेले वर्षभर धुळवडीची वाट पाहणारे सगळेच सकाळपासून सज्ज झालेत, आता हा हा रंगाचा उत्सव रंगात आला. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच आज आनंदाच्या रंगात रंगून गेले आहेत. एकमेंकावर रंग, पाणी टाकून सगळेजण मस्त एन्जॉय करतायेत. सगळ्या काळज्या, चिंता, ताणतणाव विसरून सगळेजण रंगात न्हाऊन निघतायेत. आपापसातले मतभेद विसरून एकमेकांना रंग लावत शुभेच्छा देत आहे. दिवस चढतोय तसाच या उत्सवाचा रंगही चढतोय. तिकडे राज्यातच नाहीतर देशभरात धुलिवंदन साजरं केलं जातंय. दिल्लीतील मराठी बांधवांनीही जोरदार धुलिवंदन साजरं केलं. तर लखनौमध्येही होळीची धूम सुरू आहे. तर दिल्लीतल्या बंगाली लोकांनीही जोरदार होळी साजरी केली.

close