नाशिकबाबत मनसेचं वेट अँड वॉच !

March 9, 2012 9:40 AM0 commentsViews:

09 मार्च

एकीकडे शिवसेनेची ही तयारी सुरू असतानाच मनसेने मात्र आपलं नेहमीचं वेट अँड वॉच धोरण स्विकारलं आहे. ठाण्यामध्ये आपण आपल्या सद्सद्विवेकबिुद्धीला स्मरून आणि जनमताचा आदर करून विकासाच्या मुद्यावर महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे याच मुद्यावर महायुतीनेनाशिकमध्ये मनसेला पाठिंबा द्यावा अशी मनसेची अपेक्षा असल्याचं कळतंय. मात्र मनसेनं नाशिकसाठी विचारणा केली तर त्याबाबत विचार करू असं उद्धव ठाकरे यांनीसुद्धा सांगितलं होतं. पण मनसेकडून कोणतंही शिष्टमंडळ अथवा पाठिंब्याचा कोणताही प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवला जाणार नाही अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळे नाशिकचा महापौर कोणाचा होणार याबाबत उत्सुकता कायम आहे.

close