…या गावात धुळवडीला जावयाची गाढवावरुन मिरवणूक

March 8, 2012 11:43 AM0 commentsViews: 1

08 मार्च

बीड जिल्हात विडा या गावात अनोखी पंरपरा धुळवडीच्या दिवशी जोपासली जाते. या गावात जावयाला चक्क गाढवावर बसून मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीनंतर जावयाची अंगठी, कपडे देवून त्यांचा मानसन्मान केला जातो. गेल्या 80 वर्षापासून या गावी ही पंरपरा चालत आलेली आहे. या गावातील जावयाला शोधून त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. महत्वाचं म्हणजे जावयीसुध्दा यात आनंदाने सहभागी होतात. 80 वर्षापुर्वी गावातील आनंदराव देशमुख यांनी ही पंरपरा सुरु केली. त्यांनी स्वताच्या जावयास होळी खेळायला बोलवल आणि मिरवणूक काढली..

close