फियाटची नवी कार लवकरच बाजारात

November 22, 2008 10:40 AM0 commentsViews: 5

22 नोव्हेंबर, पुणेफियाट लवकरच त्यांची नवी 'लिनोआ' कार भारतीय मार्केटमध्ये आणणार आहे. पुण्यातल्या रांजणगाव इथल्या फिएटच्या प्रोजेक्टमध्ये 'लिनोआ' चं उत्पादन सुरू झालं आहे. ही गाडी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मे, 2007 साली इस्तंबूलमधे सादर करण्यात आली. हा प्रकल्प संपूर्ण 200 एकर जागेत असून तिथं बॉडी शॉप, असेंब्ली लाईन, पेंट शॉप या सुविधाही सुरू होणार आहेत. फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स आणि टाटा कार्सच्या पॉवरट्रेन इंजिन्सची निर्मिती या प्लान्टमध्ये होणार आहे. इथं तयार होणार्‍या 'लिनोआ'चं हे सहावं व्हर्जन आहे.

close