‘रंगबाधा’झालेल्या 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

March 9, 2012 11:46 AM0 commentsViews: 3

09 मार्च

गुरुवारी होळी खेळताना मंुबईत 148 जणांना रंगबाधा झाली. यात विकास या 13 वर्षाच्या मुलाचा काल मध्यरात्री राजावाडी हॉस्पिटमध्ये विकासचा मृत्यू झाला. विकास हा कुर्ल्यातील रेल्वे कॉलनीत राहतो. इतर रुग्णांवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ही सर्व मुलं शास्त्रीनगर, कल्याणवाडी, बाल्कनी चाळ, होळी मैदान , नाईन्टी फीट या भागात राहणारी आहेत. होळी खेळल्यानंतर आंघोळ करण्यासाठी ही सगळी मुलं गेली असताना अंगावर या रंगांची रिऍक्शन आली. ज्यामुळे चक्कर येणं, अंगात त्राण न उरणं, बेशुद्ध पडणे अशा तक्रारी या मुलांनी केल्यात. आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सायन हॉस्पिटलमध्ये जाऊन रंगबाधा झालेल्या रुग्णांची भेट घेतली. दाखल रुग्णांमधील चारही गंभीर मुलांच्या परिस्थितीत सुधारणा झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणाच्या चौकशीसाठी 6 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी संांगितलं. ही समिती 2 आठवड्यांत आपला रिपोर्ट सादर करणार आहे.

close