पुण्यासाठी भुयारी कालवा बांधल्यास जादा पाणी मिळेल – अजितदादा

March 9, 2012 11:53 AM0 commentsViews: 5

09 मार्च

पुणे शहराचा आत्ताचा कालवा बंद करुन भुयारी कालवा बांधल्यास शहरासाठी 3 टीएमसी जादा पाणी उपलब्ध होऊ शकेल पण यासाठी टीडीआर (TDR) उपलब्ध करुन द्यावा लागेल, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. पुण्यात काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. सध्याच्या मोठा कालव्यातून पाण्याची गळती होतेय. भुयारी कालवा झाल्यावर ही गळती थांबवून 3 टीएमसी पाणी वाचेल हे पाणी पुणेकरांसाठी उपलब्ध होऊ शकेल अशी कल्पना त्यांनी मांडली.

close