ज्येष्ठ अभिनेते जॉय मुखर्जी यांचं निधन

March 9, 2012 11:57 AM0 commentsViews: 5

09 मार्च

प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते जॉय मुखर्जी यांचं निधन झालं आहे. ते 73 वर्षांचे होते. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. सोमवारपासूनच त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. 1960 पासून त्यांच्या करिअरला सुरुवात झाली.अनेक सिनेमांत त्यांनी रोमँटिक भुमिका केल्या. लव्ह इन टोकियो, शागिर्द, एक मुसाफिर एक हसीना, जिद्दी अशा अनेक सिनेमांत त्यांनी काम केलंय. जास्तीत जास्त सिनेमे त्यांनी आशा पारेख यांच्यासोबत केले आहे. त्यांनी हमसाया सिनेमा दिग्दर्शित आणि प्रोड्युसही केला होता. राजेश खन्ना आणि झीनत अमानचा छलिया बाबू सिनेमांचं दिग्दर्शनही केलं होतं.

close