अकोल्याच्या महापौरपदी भारिपच्या ज्योत्स्ना गवई

March 9, 2012 12:02 PM0 commentsViews: 10

09 मार्च

अकोला महानगरपालिकेच्या महापौरपदी भारिपच्या ज्योत्स्ना गवई यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजप सेनेच्या करुणा इंगळे यांचा 5 मतांनी पराभव केला. गवई यांना 39 मत तर करुणा इंगळे यांना 34 मते मिळाली. ज्योत्स्ना गवई या केवळ 24 वर्षाच्या असून त्या राज्यातील सर्वात तरुण महापौर ठरल्या आहेत. तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे रफिक सिद्दीकी यांची निवड झाली आहे.

close