कलमाडी म्हणतात, लोकसभेच्या मैदानात उतरणार !

March 9, 2012 12:13 PM0 commentsViews: 5

09 मार्च

कॉमनवेल्थ घोटाळ्यात अडकलेल्या सुरेश कलमाडींनी पुन्हा राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत दिले आहे. कॉमलवेल्थ घोटाळ्यातून मी निर्दोष मुक्त होईन आणि 2014 ची लोकसभा निवडणूक पुणे शहरातूनच लढवेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कलमाडींची नऊ महिन्यानंतर तिहार कारागृहातून जामीनावर सुटका झाली होती. कलमाडी राजकारणात सक्रीय होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती मात्र निवडणुका आणि कलमाडींवर झालेल्या आरोपामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी कलमाडी सक्रीय होणार नाही स्पष्ट केलं. मात्र आता खुद्द कलमाडी यांनी राजकारणात सक्रीय होणार असल्याचे संकेत दिले आहे.

close