मृत व्यक्तीची चौकशी करताय पोलीस

March 10, 2012 12:15 PM0 commentsViews: 1

10 मार्च

रायगड जिल्ह्यात 20 वर्षापूर्वी निधन झालेल्या अब्दुल गनी अब्दुल्ला मेस्त्री यांना मुंबई पोलिसांकडून एका खंडणीच्या प्रकरणात तपासलं जातंय. मुंबईतल्या समता नगर मधील एका बांधकाम प्रोजेक्ट संदर्भात गेल्यावर्षी गनी भाई नामक व्यक्तीने खंडणी मागितल्याची गोष्ट समोर आली होती. यासंदर्भात मुरुडच्या मेस्त्री कुटुंबाची चेंबूर पोलिसांकडून सातत्याने चौकशी केली जात आहे. मुळचे मुरुडचे असणारे अब्दुल गनी अब्दुल्ला मेस्त्री हे टेलर होते. 20 वर्षांपुर्वी वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या या चौकशीमुळे आपली नाहक बदनामी होत असल्याचा आरोप मेस्त्री कुटुंबीयांनी केला. या संदर्भात अलिबाग पोलिसांना विचारले असता या प्रकरणाची यांना माहिती नसल्याचं सांगितलं जातंय. तर चेंबूर पोलिसांनी या प्रकरणी प्रतिक्रीया द्यायला नकार दिला.

close