गुंडाला काँग्रेसने केलं स्विकृत नगरसेवक

March 10, 2012 5:23 PM0 commentsViews: 6

10 मार्च

सोलापुरात काँग्रेसने इतिहास घडवलाय ! पोलिसांच्या यादीवर 21 गुन्ह्यांची नोंद असलेला कुख्यात गुंड राजा खराडेला स्विकृत नगरसेवकपदी काँग्रेसने बसवलं आहे. राजा खराडेच्या नावावर सोलापुरातील पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत राजा खराडे एक वर्ष येरवड्‌याच्या तुरूंगात होता. झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत दोषी धरलेल्या आणि त्याचबरोबर अनेक गुन्हे दाखल झालेल्या राजा खराडे याला काँग्रसनं स्विकृत नगरसेवक म्हणून निवडलंय. केंद्रीय उर्जामंत्री सुशिलकुमार शिंदे याचे स्थानिक संपर्कप्रमुख विष्णूपंत कोठे यांचा नातू आणि काँग्रेसचे माजी महापौर महेश कोठे यांचा पुतण्या देवेंद्र कोठे याला निवडून आणण्यासाठी राजा खराडेनं मदत केल्यामुळे राजा खराडेला स्विकृत नगरसेवकपदाचे बक्षीस देण्यात आल्याचं बोलंल जातं आहे.

close