मनसेच्या पाठिंब्यासाठी आघाडीची फिल्डिंग

March 10, 2012 3:01 PM0 commentsViews: 1

10 मार्च

ठाणे महापालिकेत मनसेनं युतीला साथ दिल्याने नाशिक आणि औरंगाबादमध्ये सत्तासमीकरणं बदलतील अस चित्र निर्माण झालं होतं. त्यादृष्टीनं हालचालीही सुरु होत्या. मात्र औरंगाबाद जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यासाठी युतीच्या आधीच आघाडीनं मुंबईत मनसेच्या नेत्यांची भेट घेतली. या बैठकीत मनसेनं आघाडीला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिल्याचे आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता औरंगाबादमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत रंगत येणार आहे.

close