एटीएसचा दिल्लीतील डॉक्टरवर संशय

November 22, 2008 10:45 AM0 commentsViews: 3

22 नोव्हेंबरदिल्लीतील डॉ. आर पी सिंग महाराष्ट्राच्या एटीएसच्या रडारवर आले आहेत. लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि शंकराचार्य स्वामी अमृतानंद उर्फ दयानंद पांडे यांनी आरएसएसच्या दोन वरिष्ठ नेत्यांचा हत्येचा कट रचला अशी माहिती आहे. या कटात डॉ आर पी सिंगचाही हात असल्याचा संशय आहे. हे डॉ सिंग दिल्लीतील एका नामांकित हॉस्पीटलमध्ये डायबेटीस स्पेशालिस्ट म्हणून काम करताहेत. त्यांचा वर्ल्ड हिंदू असोसिशनशी संबंध आहे. या डॉ सिंग यांना मालेगाव बॉम्बस्फोटाची अगोदरच माहिती होती का याचा तपास एटीएस करत आहे.

close