मुख्यमंत्र्यांची दिल्ली दरबारी हजेरी

March 10, 2012 3:14 PM0 commentsViews: 1

10 मार्च

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिल्लीत काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. मुबंई महापालिकेतला काँग्रेसचा पराभव, कृपाशंकर विरोधातली कारवाई आणि आगामी राज्यसभा निवडणुका या पार्श्वभुमीवर ही भेट झाल्यानं त्याला महत्त्व आहे. या भेटीत राज्यसभेच्या निवडणुकांबाबतही चर्चा झाल्याची शक्यता आहे. राज्यसभेसाठी काँग्रेसकडून विलासराव देशमुख आणि राजीव शुक्ला यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान उद्योगमंत्री नारायण राणे यांनीही आज सोनिया गांधी आणि काँग्रेसचे खजिनदार मोतीलाल व्होरा यांची भेट घेऊन चर्चा केली.

close