सोलापूर एमआयडीसीत भीषण आग

March 10, 2012 9:59 AM0 commentsViews: 5

10 मार्च

सोलापुरात एमआयडीसीमध्ये आज सकाळी 10 च्या सुमारास अंबिका प्लास्टिक या कंपनीला आग लागली. या आगीत लाखो रुपयांची वित्तहानी झाली. ही आग इतकी भयंकर होती की शहरभर धुर आणि आगीचे लोळ दिसत होते. सकाळपासून या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.40 फोमच्या बाटल्या आणि 25 पाण्याचे टँकर यासाठी वापरण्यात येत आहे. अजूनही ही आग आटोक्यात आलेली नाही.

close