कापसावरची निर्यातबंदी आज उठणार ?

March 10, 2012 10:06 AM0 commentsViews: 1

10 मार्च

कापसावरची निर्यातबंदी आज उठण्याची शक्यता आहे. याबाबात आज एक सचिवस्तरीय बैठक होत आहे. या बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे. काल संध्याकाळी प्रणल मुखर्जी, शरद पवार आणि आनंद शर्मा या तिघांची बैठक झाली. तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. पण या बैठकीत प्रणव मुखर्जी आणि शरद पवार दोघेही कापसावरची निर्यातबंदी उठवण्याच्या बाजून होते अशी माहिती सूत्रांकडून मिळली. दरम्यान,संध्याकाळ पर्यंत कापसाची निर्यात बंदी उठणार याला खुद्द कृषीमंत्री शरद पवार यांनी दुजोरा दिला आहे.

close