मायावतींची राज्यसभेत जाण्याच्या तयारीत

March 10, 2012 5:45 PM0 commentsViews: 3

10 मार्च

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती उत्तर प्रदेश विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राज्यसभेत जाण्याच्या तयारीत आहेत. पक्षाच्या सदस्यांची त्यांनी दोन दिवसांची बैठक बोलावली आहे. आज त्यांनी पक्षाच्या आमदारांची आणि खासदारांशी चर्चा केली. उद्या त्या पक्षाचे पदाधिकारी आणि क्षेत्रीय समन्वयकांची भेट घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या दारुण पराभवावर यावेळी चर्चा होणार आहे. मायावती पक्षाबाबतही काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचीही शक्यता आहे. शिवाय उत्तर प्रदेश विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण असेल, याचाही निर्णय यावेळी घेतला जाईल.

close