सुवर्ण सहकारी बँकेचं संचालक मंडळ अटकेत

November 22, 2008 10:52 AM0 commentsViews: 5

22 नोव्हेंबर, पुणेनितीन चौधरी तब्बल 322 कोटींच्या अपहार प्रकरणी पुण्यातल्या सुवर्ण सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला पोलिसांनी अटक केली आहे. यात माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर आगाशे यांच्यासह 14 संचालकांचा समावेश आहे. त्यांना शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं आहे.सप्टेंबर 2006 मध्ये हा गैरव्यवहार उघडकीस आला होता. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष ज्ञानेश्वर आगाशे आणि संचालक मंडळाच्या सभासदांनी कागदोपत्री बोगस मालमत्ता दाखवून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतली होती. या कर्जाची परतफेड न झाल्याने बँक दिवाळखोरीत निघाली होती. त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं या बँकेवर प्रशासक नेमला होता.

close