सीबीआयच्या हाती मोठ्या ‘माश्यांचे’ पुरावे !

March 12, 2012 8:42 AM0 commentsViews: 3

12 मार्च

बहुचर्चित आदर्श घोटाळाप्रकरणात सीबीआयकडे काही मोठ्या व्यक्तींविरोधात पुरावे असल्याची माहिती सीबीआयने कोर्टात सादर केली आहे. त्यावर सीबीआयने या लोकांविरोधात एका दिवसात थेट कारवाई करावी असे आदेश कोर्टाने दिले आहेत. तसेच भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये सीबीआयने कडक कारवाई करावी असंही कोर्टाने सुनावलं आहे. याप्रकरणात सीबीआयच्या तपासाबाबत हायकोर्टाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. दरम्यान कोर्टाने अंमलबजावणी संचालनालय अर्थात इडीच्या संचालकांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे इडीचे संचालक आज कोर्टात हजर झाले आणि त्यांनीही तपासाचा अहवाल कोर्टात सादर केला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 मार्चला होणार आहे.

close