किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्साहात साजरी

March 10, 2012 12:04 PM0 commentsViews: 4

10 मार्च

तिथीनुसार आज किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जुन्नरचे नगराध्यक्ष अनिल मेहेर यांच्या हस्ते सकाळी शिवाई देवीची महापूजा आणि अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवाई देवी मंदिर ते शिवजन्म अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 11.45 च्या सुमारास शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, खासदार शिवाजी अढळराव पाटील हेही आज शिवनेरीवर उपस्थित होते.

close