जळगाव बंदला समिश्र प्रतिसाद

March 12, 2012 9:42 AM0 commentsViews: 8

12 मार्च

स्वस्त घरकुल योजना प्रकरणी सुरेश जैन यांच्या अटके विरोधात शिवसेनेनं पुकारलेल्या बंदला समिश्र प्रतिसाद मिळतोय. भुसावळमध्ये पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे. दरम्यान, काल सुरेश जैन यांना अमळनेर पोलीस स्टेशनला हलवण्यात आलं. तिथेच त्यांची चौकशी होणार आहे. काल सुरेश जैन यांना धरणगावजवळ नाट्यमयरित्या अटक करण्यात आली. जैन यांना रात्री शिरपूरकडे जात असताना धरणगावजवळ अटक करण्यात आली. 29 कोटी 59 लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी चौकशीत सुरेश जैन यांचं नाव घेतल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. आणि आता परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसैनिकांचं निवेदन स्वीकारायला पोलीस आणि प्रशासनाने नकार दिला आहे.

close