देवकरांच्या अटकेची मागणी राजकीय हेतूने – आर.आर.पाटील

March 12, 2012 8:57 AM0 commentsViews: 2

12 मार्च

घरकुल योजना घोटाळा प्रकरणी गुलाबराव देवकरांच्या अटकेची मागणी राजकीय हेतूनं होत असल्याची टीका गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केली. याप्रकरणी पुराव्यानुसार कायद्याने कारवाई केली जाते आहे त्यानुसार पोलीस कारवाई करत आहे. राज्य सरकारने राजकीय हेतूने कोणाला पाठिशी घालू नये असंही आर.आर.पाटील यांनी म्हटलं. त्याचप्रमाणे राजकीय हेतूने प्रेरीत होऊन कोणीही आरोप करू नये असंही आर.आर.पाटील ठणकावून सांगितले.

close