महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली

March 12, 2012 9:16 AM0 commentsViews: 13

12 मार्च

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला आज सुरूवात झाली. यशवंतरावांची कर्मभूमी कराड इथं त्यांच्या 'प्रितीसंगम' या त्यांच्या समाधीस्थळी मुख्य सोहळा झाला. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला आदरांजली वाहिली. याशिवाय विद्यार्थ्यांच्या समुहगान कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं. यात सुमारे 12 हजार विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. तर आज मुंबईतही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

close