कापसावर निर्यात बंदी मागे ?

March 12, 2012 10:34 AM0 commentsViews: 2

12 मार्च

अखेर केंद्र सरकारने कापसावरची निर्यातबंदी उठवली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. याविषयीची अधिकृत घोषणा आज होणार आहे. कापसावर निर्यातबंदीचा केंद्राच्या निर्णयाविरुध्द विदर्भातील शेतकर्‍यांनी कडाडून विरोध केला. निर्यात बंदी मागे घ्या या मागणीसाठी विदर्भात आंदोलन झाली. कापसाला मिळत असेलेला भाव आणि त्यावर घालण्यात आलेली बंदी यासंदर्भात कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहुन बंदी बाबत फेरविचार व्हावा विनंती केली. केंद्रीय मंत्र्यांनी यासंदर्भात दोन बैठका पार पडल्यात. अखेर शरद पवार यांच्या मागणीला यश मिळालं आहे.

close