देशाची आर्थिक प्रगती समाधानकारक – राष्ट्रपती

March 12, 2012 10:41 AM0 commentsViews: 3

12 मार्च

देशाची आर्थिक प्रगती समाधानकारक आहे. पण विकास दर 8 ते 9 टक्क्यांवर जायला हवा, असं राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी म्हटलं आहे. सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय, महत्वाच्या योजना राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात मांडले. मात्र राष्ट्रपतींनी अल्पसंख्याक कोटाच्या मुद्दा मांडताच द्रमुकच्या खासदारांनी राष्ट्रपतींच्या समोर घोषणा द्यायला सुरूवात केली. संसदेच्या बजेट अधिवेशनाला आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरूवात झाली.

close