उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री विजय बहुगुणा

March 12, 2012 5:45 PM0 commentsViews: 3

12 मार्च

विजय बहुगुणा उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री होणार आहे. काँग्रेस हायकमांडनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर पण मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली होती. अंतर्गत वादामुळे काँग्रेसला मुख्यमंत्री निवडण्यात उशीर होत होता. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी आज याबाबत महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेतली. आणि त्यानंतर विजय बहुगुणा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली..

close