मराठीत येतोय ‘नो एंट्री’

March 12, 2012 12:12 PM0 commentsViews: 1

12 मार्च

बॉलिवूडचा सलमान खान, अनिल कपूर, फरदीन खान या त्रिकुटाची भन्नाट कॉमेडी असलेला नो एंट्री सिनेमा आता मराठीत एंट्री करतोय. मराठी नो एंट्रीची निर्मिती बोनी कपूरची आहे. आणि या सिनेमात भरत जाधवची मुख्य भूमिका असण्याची दाट शक्यता आहे. अनिल कपूर, सलमान खान, बिपाशा बासू यांची भूमिका असलेला हिंदी नो एंट्री हिट झाला होता. तीन विवाहित तरुण घरची 'दाल' खाऊन बाहेरच्या 'बिर्याणी' च्या मागे पडतात. यात तिंघाची कशी फजिती होते याची गंमत नो एन्ट्रीत पाह्याला मिळाली. आता मराठीत 'नो एंट्री' येत आहे त्यामुळे 'बिर्याणी'च्या मागे पडणारे तिन अभिनेते कोण ? आणि अभिनेत्री कोण ? दिग्दर्शन कोणाचं असेल, कोण कोण कलाकार यात काम करणार आहे याची इंडस्ट्रीमध्ये चर्चा सुरू आहे.

close