सचिन..महाशतक कर रे बाबा !

March 12, 2012 6:01 PM0 commentsViews: 10

12 मार्च

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर महाशतकाच्या नावेला ओढत (पडत) तब्बल एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र अजून त्याच्या महाशतकाकडे क्रिकेटप्रेमींना वाट लावून आहे. एशिया कप स्पर्धेला सुरुवात झालीये आणि भारताची उद्या पहिली मॅच असेल ती श्रीलंकेशी. पण भारतीय क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा प्रतीक्षा असेल ती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या महाशतकाची. 1 वर्ष वाट पाहून थकलेल्या क्रिकेटप्रेमी मनापासून म्हणत असतील आता तरी शतक कर रे बाबा…!

शेवटची सेंच्युरी करुन सचिन तेंडुलकरला आज बरोबर एक वर्ष पूर्ण झालंय. 12 मार्च 2011 ला वर्ल्ड कप स्पर्धेत सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुध्द शानदार सेंच्युरी ठोकली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली ही त्याची 99 वी सेंच्युरी ठरली होती. या मॅचमध्ये सचिननं 111 रन्स केले होते, पण भारतीय टीम ही मॅच 3 विकेटने हरली होती. सचिनच्या नावावर सध्या टेस्ट क्रिकेटमध्ये 51 तर वन डे क्रिकेटमध्ये 48 सेंच्युरी जमा आहेत. पण गेल्या वर्षभरात 100 व्या सेंच्युरीने त्याला हुलकावणीच दिली. तब्बल 4 वेळा तो सेंच्युरीच्या जवळ येऊन आऊट झाला. वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुध्द त्यानं 85 रन्स केले, इंग्लंड दौर्‍यातल्या चौथ्या टेस्टमध्ये तो 91 रन्समध्ये आऊट झाला. तर मुंबईत वेस्ट इंडिजविरुध्द झालेल्या मॅचमध्ये रवि रामपॉलनं त्याला 94 रन्सवर आऊट केलं. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात सचिन 80 रन्सवर आऊट झाला. आता बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या एशिया कप स्पर्धेत सचिनचं महाशतक पूर्ण व्हावं अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमी बाळगून आहेत.

close