माजी पोलीस आयुक्त हसन गफूर यांचे निधन

March 12, 2012 2:21 PM0 commentsViews: 2

12 मार्च

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हसन गफूर यांचे आज ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने ब्रिच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.ते 63 वर्षांचे होते. गफूर हे 1974 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी होते. 29 फेब्रुवारी 2008 ते 13 जून 2009 या काळात त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिले.सय्यद मजिदुल्ला यांच्यानंतरचे ते मुंबईचे दुसरे मुस्लिम पोलीस आयुक्त होते. 31 डिसेंबर 2010 ला ते नोकरीतून निवृत्त झाले.

close