शिवसेनेनं केला वाघबीळचा पूल जनतेसाठी खुला

March 12, 2012 2:31 PM0 commentsViews: 4

12 मार्च

ठाण्यातील घोडबंदर रोडवर नेहमीच वाहतुकीची कोंडीला सामोर जाणार्‍यासाठी आज शिवसेनेनं मार्ग मोकळा करुन दिला. वारंवार आंदोलन करुन कोणतीच दखल घेतली जात नसल्यामुळे आज अखेर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पूलाचे उद्घाटन करुन नागरिकांसाठी खुला केला. घोडबंदर रोडवर एमएसआरडीसी (MSRDC) च्या तीन फ्लायओव्हर्सचं बांधकाम सुरू आहे. पण वाघबीळ येथील फ्लायओव्हर तयार होऊनही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. उद्घाटनाच्या प्रतिक्षेत या फ्लायओव्हरला उशीर होतोय असं कारण सांगण्यात येत होतं. म्हणून प्रताप सरनाईक यांनी आंदोलनचा हत्यार उपसले. आणि दणका देत पूल वाहतुकीसाठी खुला केला. यावेळी इतर पुलांच कामही लवकरात लवकर करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा असा इशाराही त्यांनी दिला.

close