शरद पवारांची प्रकृती स्थिर

March 13, 2012 9:43 AM0 commentsViews: 6

13 मार्च

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना लोकसभेतच भोवळ आली होती. पवार यांना तातडीने तपासणीसाठी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी करुन घाबरण्याचं काही कारण नसल्याचं सांगितलं. कामाची दगदग,धावपळीमुळे पवारांना थकवा आल्यामुळे भोवळ आली असावी असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. आता शरद पवार यांची प्रकृती चांगली असून उद्या ते नियोजित कार्यक्रमांना सुरूवात करणार आहेत. तपासणी पुर्ण झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत पवारांना डिस्चार्ज मिळेल. पवारांनी आज दिवसभरातील सर्व कार्यक्रम उद्यावर ढकलली आहे त्यामुळे संपूर्ण दिवसभर आराम करणार आहेत अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

close