रिक्षाचालकांची 5 रु. भाडेवाढीची मागणी

March 12, 2012 2:41 PM0 commentsViews: 2

12 मार्च

रिक्षा चालक संघटनांनी रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरली आहे. आपल्या मागण्या झाल्या नाही तर 15 एप्रिलपासून राज्यव्यापी बंदचा इशारा रिक्षाचालक संघटनांनी दिला. सरकारने मुंबई आणि ठाण्यात पहिल्या दीड किलोमीटरसाठी 5 रूपयंाची वाढ करावी तसेच नंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 9 रूपयांनी वाढ करावी अशी मागणी रिक्षा संघटनांनी केलीे आहे. तर दुसरीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 4 रूपयांनी वाढ करावी, तसेच इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती करू नये अशी मागणीसुद्धा करण्यात आली. पुण्यात शरद राव, बाबा आढाव आणि इतर रिक्षा प्रतिनिधींंची काल बैठक झाली यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

close