राज्यात 5 महापालिकांच्या निवडणुका जाहीर

March 13, 2012 10:05 AM0 commentsViews: 1

13 मार्च

अलीकडेच झालेल्या 10 महानगरपालिका निवडणुकीनंतर आज निवडणूक आयोगाने 5 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली. लातूर, चंद्रपूर, परभणी, मालेगाव आणि भिंवडी या महानगरपालिकेसाठी पुढील महिन्यात 15 एप्रिलला मतदान होणार आहे तर दुसर्‍यादिवशीच 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी पत्रकार परिषदेत केली. आज घोषणा झाल्यापासून पत्रकार परिषद संपताच 5 ही महानगरपालिकांच्या हद्दीत आचारसंहिता लागू झाली आहे.

close