गावकर्‍यांनी घेरल्यामुळे गव्यानं प्राण सोडला

March 12, 2012 3:04 PM0 commentsViews: 5

12 मार्च

कोल्हापूरमध्ये लोकांची गर्दीत घेरला गेल्यामुळे एका गव्याला आपला जीव गमवावा लागला. जिल्ह्यातील बिद्री इथल्या एका शेतात सकाळी 10च्या सुमारास गवा घुसला. त्याला हुसाकावून लावण्यासाठी शेतकर्‍यांनी प्रयत्न केला असता त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला. गव्यानं हल्ला केल्याची माहिती गावकर्‍यांनी तत्काळ वनविभागाच्या अधिकार्‍यांना कळवली. पण अधिकार्‍यांनी घटनास्थळी कर्मचारी पाठवले. बराच वेळ प्रयत्न करुन सुध्दा गव्याला हुसकावुन लावलं काही शक्य झालं नाही. त्यामुळे गव्याला बघणार्‍यांची गर्दी आणखी वाढली. त्यामुळे अपुरे कर्मचारी आणि गावकर्‍यांच्या अतीउत्साहामुळे गवा बिथरुन खाली बसला. अचानक बसलेला गवा पाहुन गावकरी शांत झाले. काही कर्मचार्‍यांनी जवळ जाण्याचा प्रयत्न केला गवा काहीच करत नसल्यामुळे संशय बळावला. गव्याल्या पाणी पाजण्यात आलं पण काही प्रतिउत्तर गव्यानं दिलं नाही. अखेर गव्यानं आपला प्राण सोडला. गव्यानं अचानक प्राण सोडल्यामुळे जिल्हात खळबळ उडाली. मोठ्या संख्येनं जमलेल्या शेतकर्‍यांनी गव्याला अखेरचा निरोप दिला. पण वनविभागाचे अधिकारी मात्र फिरकलेच नाही. त्यामुळे गव्याला आपला प्राण गमवावा लागला असा आरोप गावकर्‍यांनी केला.

close