गोंदियात 23 पोती साखर जप्त ; एकाला अटक

March 13, 2012 10:39 AM0 commentsViews: 1

13 मार्च

गोंदिया जिल्हात रेशन माफियांचा काळा बाजार राजरोसपणे सुरुच आहे. गोंदियाच्या आमगावमधल्या द्वारकाप्रसाद अग्रवाल यांच्या दुकानावर छापा टाकून पोलिसांनी 23 पोती साखर जप्त केली आहे. विशेष म्हणजे या सगळ्या पोत्यांवर सरकारी मार्क आहेत. गोंदिया जिल्हा पथकाने ही कारवाई केली याप्रकरणी द्वारकाप्रसाद यांना अटक करण्यात आली आहे. यापुर्वी द्वारकाप्रसाद यांचे भाऊ देवकीनंदन अग्रवाल यांच्यावरही जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल आहेत. अग्रवाल बंधू गेल्या अनेक वर्षापासून रेशनचा काळाबाजार करण्यात गुंतलेले आहे. य्

close