नागपुरात पोलिसांनीच लावलं सभागृहाला टाळं

November 22, 2008 12:34 PM0 commentsViews: 5

22 नोव्हेंबर नागपूरखैरलांजी अ‍ॅक्शन कमेटी आणि आंबेडकरी आत्मसन्मान आंदोलनातर्फे नागपुरात पासून दोन दिवसीय परिषदेची सुरुवात होणार होती. पण ज्या सभागृहात ही परिषद होणार होती त्या सभागृहालाच पोलिसांनी टाळ ठोकलं. त्यामुळं ही परिषद सुरू होऊ शकली नाही. परिषदेसाठी जमलेल्या लोकांनी तोंडावर काळ्या पट्टया लावून या घटनेचा निषेध केला. या परिषदेला प्रसिद्ध लोकशाहीर गदर येणार होते त्यामुळेच पोलिसांनी परिषद घेऊ दिली नाही, अशी माहिती कार्यकर्त्यांनी दिली.

close