नाशिकमध्ये पारंपरिक रंगपंचमी साजरी

March 12, 2012 4:39 PM0 commentsViews: 64

12 मार्च

नाशिकमध्ये पेशवेकालीन रहाडींमध्ये डुंबून पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी करण्यात आली. रहाडी म्हणजे दगडी हौद. जुन्या नाशिकमध्ये पेशवे काळापासूनच्या अनेक रहाडी आहेत. त्यातल्या काही पक्क्या रस्त्याखाली गडप झाल्या आहेत. मात्र पिंपळपार, सरदार चौक, दिल्ली दरवाजा या काही मानाच्या रहाडी आजही खणल्या जातात. रंगांनी भरलेल्या या रहाडींची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर मानकर्‍यानं त्यात उडी टाकल्यावर सगळेच जण रंगात न्हाऊन निघतात. नाशिकमध्ये एकाचवेळी पारंपरिक रहाडींची रंगपंचमी आणि शॉवर डान्सची आधुनिक रंगपंचमी साजरी केली गेली.

close