कृपांच्या संपत्तीची जप्ती कायम ;चौकशी सुरुच राहणार

March 13, 2012 12:04 PM0 commentsViews: 2

13 मार्च

कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांची कोणतीही नवी मालमत्ता जप्त करायला कोर्टाने स्थगिती दिली आहे. पण बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी त्यांची चौकशी सुरू ठेवण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर कृपाशंकर यांच्या मुंबईतल्या मालमत्ता पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सरकारला हव्या असलेल्या सर्व मालमत्ता जप्त केल्याची माहिती महाराष्ट्र सरकारच्या वकीलांनी सुप्रीम कोर्टात दिली. तसेच कृपाशंकर सिंह तसेच त्यांच्या पत्नी आणि मुलांनी आपण कुठलीही मालमत्ता विकणार नसल्याचं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं. त्यानंतर कोर्टाने कृपाशंकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची नवी संपत्ती जप्त करायला स्थगिती दिली.

close