भारत-पाक सेमिफायनलची चौकशी होणार

March 12, 2012 5:26 PM0 commentsViews: 2

12 मार्च

2011 च्या वर्ल्ड कपमधली भारत आणि पाकिस्तान दरम्याची सेमीफायनल मॅच फिक्स असल्याची खळबळजनक बातमी इंग्लंडच्या संडे टाईम्स या पेपरने दिल्यामुळे एकच खळबळ उडाली. या बातमीची आयसीसीनंही गंभीर दखल घेतली असून चौकशी करण्याची तयारी दर्शवली आहे. या मॅचच्या निश्चितीसाठी बॉलिवूडमधल्या एका अभिनेत्रीचा वापर करण्यात आला होता, अशी माहितीही यात देण्यात आली. या मॅचमध्ये भारतानं 260 रन्स केले होते. आणि पाकिस्तानची इनिंग 231 रन्सवर ऑलआऊट झाली होती. सचिन तेंडुलकरने या मॅचमध्ये 84 रन्स केले होते. पण त्याला पाकिस्तानच्या फिल्डर्सने तब्बल 5 वेळा जीवदान दिलं होतं. दिल्लीतल्या एका बुकीनं संडे टाईम्सला ही माहिती दिली.

दरम्यान, संडे टाईम्सने इंग्लंड काऊंटी क्रिकेटमधल्या एका मॅचमध्ये फिक्सिंग झाल्याचं म्हटलं आहे. सन्डे टाईम्सने याविषयी बातमी छापताना फिक्सिंगची नवी बाजारपेठच इंग्लंडमध्ये तयार झाल्याचं म्हटलं आहे. शिवाय हे बुकी काऊंटी क्रिकेटर्सबरोबरच आंतरराष्ट्रीय खेळाडूंशीही संपर्कात असतात असं म्हटलंय. काही आठवड्यांपूर्वीच इसेक्स काऊंटीचा बॉलर मर्वन वेस्टफिल्डने बुकीकडून पैसे घेतल्याची कबुली दिली होती. त्यानंतर तो तुरुंगात आहे.

close