अण्णांचं जंतरमंतरवर लाक्षणिक उपोषण

March 13, 2012 2:47 PM0 commentsViews: 2

13 मार्च

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे दिल्लीत जंतरमंतरवर 18 तारखेला लाक्षणिक उपोषण करणार आहेत. मध्यप्रदेशात हत्या झालेलेआयपीएस अधिकारी नरेंद्रकुमार यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी अण्णांनी केली आहे. सक्षम व्हिसल ब्लॉवर बिल आणा अशी मागणीदेखील अण्णांनी केली आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील, त्या दिवसापासूनच जनआंदोलन सुरु करणार असल्याचं अण्णा हजारेंनी जाहीर केलं आहे.

close