मुंबईमध्ये टॅक्सीत 1 रुपयाने भाडेवाढ

March 13, 2012 4:34 PM0 commentsViews: 5

13 मार्च

रेल्वे बजेट सादर होण्याच्या एक दिवस आधी मुंबईकरांना टॅक्सी भाडेवाढीचा झटका बसला आहे. टॅक्सीच्या भाड्यात 1 रुपयांनी भाडेवाढ करण्यात आली. आता टॅक्सी भाडं सुरुवातीला 16 रुपयांवरुन 17 रुपये होईल, त्यानंतर प्रत्येक किलोमीटरमागे 50 पैसे वाढवण्यात आले आहेत. ही भाडेवाढीची 18 मार्चपासून लागू होणार आहे. टॅक्सी असोसिएशनं 20 रुपये भाडेवाढ मागितली होती. पण सरकारने फक्त एक रुपये भाडे वाढ दिल्याचे टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष ए.एल.क्वॉड्रोस यांनी सांगितलं आहे.

close