श्रीलंकेला हरवून,टीम इंडियाची विजयी सलामी

March 13, 2012 4:41 PM0 commentsViews: 4

13 मार्च

भारतीय उपखंडात खेळताना टीम इंडियाला अखेर सूर गवसला. एशिया कपमध्ये स्पर्धेत भारताने श्रीलंकेचा 50 रन्सनी पराभव केला. लंकन टीमने टॉस जिंकून भारताला पहिली बॅटिंग दिली. सचिन तेंडुलकर 6 रन्सवर आऊट झाला. पण गंभीर आणि विराट कोहलीने पहिल्या बॅटिंगचा फायदा उचलत दमदार सेंच्युरी ठोकली. गंभीरने 100 तर विराटने 108 रन केले. यानंतर आलेल्या एम एस धोणी आणि सुरेश रैनानंही फटकेबाजी करत लंकेसमोर 305 रन्सचं आव्हान ठेवलं. याला उत्तर देताना श्रीलंकेची टीम 254 रन्सवर ऑलआऊट झाली. जयवर्धने तसेच संगकारा पिचवर होते तोपर्यंत लंकेला विजयाची आशा होती. पण या दोघांना इतर बॅट्समनची साथ मिळाली नाही. भारताकडून इरफान पठाणनं चार तर आर अश्विन आणि विनय कुमारनं प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

close