पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या मोहिनी लांडे

March 13, 2012 4:46 PM0 commentsViews: 4

13 मार्च

पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहिनी लांडे यांची तर उपमहापौैरपदी राजू मिसळ यांची निवड झाली आहे. आज झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपनेही आपले उमेदवार उभे केले होते. पण ऐनवेळी भाजपच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उरले. अखेर बहुमतात असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी शिवसेनेच्या शारदा बाबर आणि धनंजय आल्हाट या दोन्ही उमेदवारांना पराभूत करुन विजय मिळवला. मोहिनी लांडे ह्या अपक्ष आमदार विलास लांडे ह्यांच्या पत्नी आहेत. आपण शहरातील समस्या सोडवणार असल्याचं आश्वासन यावेळी नवनिर्वाचित महापौरांनी दिलं.

close