निलंबित जिल्हाधिकार्‍याकडे 118 कोटींची मालमत्ता

March 14, 2012 12:28 PM0 commentsViews: 6

14 मार्च

उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याप्रकरणी रायगडचे निलंबित उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर यांना अँटी करप्शनने ताब्यात घेतलं आहेत. नितीश ठाकूर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर तब्बल 118 कोटी 39 लाख रुपयांची संपत्ती आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि नवी मुंबईत 26 ठिकाणी त्यांच्या मालमत्ता आहेत. ठाणे अँटी करप्शन ब्युरोच्या 16 पथकांनी आज ही कारवाई केली. नितीश ठाकूर यांनी मुंबईचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि रायगडचे उपजिल्हाधिकारी म्हणून काम केलं आहे. पण 2005 मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

नितेश ठाकूरची गडगंज माया

- एसकार्ड इन्फ्रासोल प्रा.लि. – 80 % गुंतवणूक- रायगड जिल्ह्यात सात रिसॉर्ट्स- विलेपार्ले – 3 फ्लॅट्स- बोरिवली पश्चिम : 3 फ्लॅट्स- कांदिवली – ठाकूर कॉम्प्लेक्स : 3 फ्लॅट्स- गोराई : एक बंगला- अलिबाग : 6 दुकानं, 6 ऑफिसेस- मुरुड : 22 खोल्यंाचं हॉटेल- रेंज रोव्हर, लँड क्रूझरसाख्या नऊ आलिशान गाड्या

close