पुण्याचं पाणी अजित पवारांनी वळवले – गिरीश बापट

March 14, 2012 3:33 PM0 commentsViews: 18

14 मार्च

पुण्याचा पाणी प्रश्न हा अजित पवार यांनीच निर्माण केलेला प्रश्न आहे. शेतीसाठी पाणी वळवल्यामुळे हा पाणीप्रश्न निर्माण झाला. असा आरोप भाजपचे आमदार गिरीश बापट यांनी केला. मध्यंतरी पुण्याला पाणीकपात झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झाली. विशेषत: नोकरदार वर्गाला याचा मोठा फटका बसतोय. त्यावर पुणे महापालिकेनं, मुंबई महापालिकेसारखंच स्वत:चं धरण बांधावं असा सल्ला अजित पवारांनी दिला.

close