सापडलेले 8 लाखांचे दागिने अलकाने परत केले !

March 14, 2012 3:39 PM0 commentsViews: 68

14 मार्च

फसवणुकीची अनेक उदाहरणं आपण रोज पाहतो. पण प्रामणिकपणाची उदाहरणं अपवादात्मक असतात. डोंबिवलीतल्या अलका सरोदे या मुलीने आठ लाखांचे दागिने परत केल्याची घटना घडली आहे. राहुल नगरमध्ये राहणारी अलका कचरा वेचण्याचं काम करते. काळूनगरमधल्या वेदांत सोससायटीतले विनय उलकंदे तुळजापूरला गेले होते. जाताना त्यांनी कपाटात ठेवलेले दागिने एका पिशवीत भरून घरातल्या कचर्‍याच्या डब्याजवळ ठेवले होते. त्यांच्या सुनेकडून नजरचुकीने दागिन्यांचीच पिशवी कचर्‍याच्या डब्यात टाकली गेली. देवदर्शनावरून परतल्यानंतर उलकंदे यांनी दागिन्याच्या पिशवीचा शोध घेतला असता ती कचरापेटीत गेल्याचे त्यांच्या लक्षात आलं. याप्रकरणी त्यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. अलकाला कचर्‍यामध्ये ती पिशवी सापडल्यावर तिनं ती पोलिसांना नेऊन दिली. अलकाचा प्रामाणिकपणा पाहुन पोलीस ही हारखून गेले. उलकंदे दाम्पत्यांनी अलकाला रोख रक्कम देऊन तिचा सत्कार केला.

close