दौंडकरांची लोकलची मागणी

March 14, 2012 6:12 AM0 commentsViews: 4

14 मार्च

दौंड पुणे मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. कोणी अभ्यासासाठी तर कोणी कामासाठी.. पण त्यांना प्रवास करावा लागतो तो दिवसातून दोनदा धावणारी शटल किंवा मग एखाद्या एक्सप्रेसमधून.. अर्थात या गाड्यांमध्ये नीट जागा मिळणं हेही मुश्कीलच. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून दौंडकर मागणी करतायत ती लोकलची.. गाड्यांचा वेग वाढणे तसेच लोकल सुरु होण्यासाठी विद्युतीकरणाची मागणी करण्यात येतेय. लवकरच हे विद्युतीकरण पूर्ण होईल असं आश्वासनही देण्यात येत आहे. पण याची अंमलबजावणी मात्र होत नाही. त्यामुळे या बजेटमध्ये तरी हे आश्वासन पूर्ण होणार का याची वाट दौंडकर पाहत आहे.

close