शिवस्मारकाचा प्रस्ताव सरकारने गुंडाळला

March 14, 2012 4:32 PM0 commentsViews: 1

14 मार्च

अरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिवस्मारकाचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण खात्याने फेटाळला आहे. अरबी समुद्रात दीड किलोमीटर आतमध्ये हे पाचशे कोटी रुपयांचं भव्य शिवस्मारक होणार होते. हे शिवस्मारक कसे असावे याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने 50 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद केली होती. पण केंद्रीय पर्यावरण खात्याने शिवस्मारकाच्या ठिकाणाला आक्षेप घेतला, त्यामुळे राज्यसरकारला शिवस्मारकाचा पर्यायी शोध घ्यावा लागला. आय बी एन लोकमतला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवस्मारकासाठीचे नवे ठिकाण वरळी किनार्‍याजवळ निश्चित केले आहे. ह्या ठिकाणला लवकरच राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल असं समजतंय शिवस्मारकाचा मूळ प्रस्ताव सरकारने गुंडाळला याबाबत आय बी एन लोकमतने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता ही बाब उघड झाली.

close