पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या वैशाली बनकर

March 15, 2012 9:39 AM0 commentsViews: 13

15 मार्च

पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या वैशाली बनकर विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपच्या वर्षा तापकीर यांचा पराभव केला आहे. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे वादग्रस्त नगरसेवक दीपक मानकर विजयी झाले आहेत. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून विनायक निम्हण गटाच्या मुकारी अलगुडे यांनी माघार घेतली होती. त्यामुळे मानकरांच्या उपमहापौरपदाचा मार्ग मोकळा झाला होता. विशेष म्हणजे दिपक मानकर यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाली आहे त्यामुळे उपमहापौरपदी एका गुन्हेगाराची निवड झाल्यामुळे पुणेकरांमध्ये संताप व्यक्त होतं आहे.

close